सोलापूर | प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडी, सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने संविधान सभा पूर्वतयारी आढावा बैठक व पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. सोमनाथ साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सोलापूर | प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी, सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने संविधान सभा पूर्वतयारी आढावा बैठक व पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. सोमनाथ साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आगामी संविधान सभेच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा घेण्यात आला. तसेच या कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने युवकांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश केला. युवकांच्या पक्षप्रवेशामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या युवकांचे स्वागत केले.

या कार्यक्रमाला सोलापूर शहर व जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडीखंबे, शहर अध्यक्ष प्रशांत गोनेवर, युवक अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा महा सचिव अनिरुद्ध वाघमारे, शहर सचिव विनोद इंगळे, युवा नेते सुहास सावंत युवा नेते विक्रांत गायकवाड, नरेंद्र शिंदे, राहुल शिंदे व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रकाशपर्व न्यूज | सोलापूर