सोलापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय्य आणि योग्य दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज (दि. १६ नोव्हेंबर) सोलापुरात भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता चार पुतळा, हुतात्मा चौक येथून या मोर्चाला सुरुवात होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी सहभागी होण्याची शक्यता असून, संघटनेने एक लाख शेतकरी सहभागी होण्याचा दावा केला आहे.
