बाळापूर प्रतिनिधी रामचंद्र नावकार–
पुणे येथील बार्टीचे व्यवस्थापक संचालक सुनील वारे यांचा नुकताच शेगाव येथील कोमल तायडे (इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर) व कुटुंबीयांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या सत्कार समारंभाला सामाजिक नेते जि. ओ. तायडे, सौ. सुनिता तायडे, पी. ए. अखाडे, बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार, डावरे यांच्यासह अन्य बार्टीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात विविध सामाजिक आणि शैक्षणिक योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे होते:
बार्टीच्या माध्यमातून RTI कायद्याची अंमलबजावणी लवकरच सुरू करणे.१२वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी JEE व NEET परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण केंद्र सुरू करणे.तालुका व जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे स्थापन करणे.प्रोफेशनल पदवीधर विद्यार्थ्यांना नॅशनल/इंटरनॅशनल वर्कशॉप, प्रोजेक्ट, सेमिनार व संशोधन केंद्रांना भेटी देण्यासाठी प्रवास व निवासी खर्चासाठी आर्थिक मदत पुरवणे.बार्टी आर्टीमार्फत रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र स्थापन करणे.NDA व विदेशी भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करणे.

वरील सर्व प्रस्तावांवर संचालक सुनील वारे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच शासनाकडे प्रस्ताव पाठवून त्यांची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
प्रकाश पर्व न्यूज आवाज वंचित बहुजनांचा