
बदलापूर प्रतिनिधी – विजय धोंडीराम गायकवाड
बदलापूर पश्चिम एरंजाड येथील श्रीजी स्क्वेअर कॉम्प्लेक्समध्ये वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजनांबाबत रहिवाशांची बैठक पार पडली. या बैठकीत बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश बेंडकुळे यांनी उपस्थितांना सुरक्षा संबंधित महत्त्वाच्या सूचना दिल्या.

बेंडकुळे म्हणाले, “इमारतीमधील रहिवाशांनी समन्वय कमिटी तयार करून एकमेकांशी फोनवर संपर्क साधावा. माहितीची देवाणघेवाण नियमितपणे केली तर कोणत्याही संभाव्य अपघात किंवा चोरीसारख्या घटनांना वेळीच प्रतिबंध होऊ शकतो.
“ते पुढे म्हणाले, “बिल्डिंगमध्ये फक्त आवश्यक गेट सुरू ठेवा. उर्वरित गेट कायम बंद ठेवावेत. अनोळखी व्यक्तींना कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश देऊ नका. बाईक किंवा अन्य वाहनांना ओळख पटण्यासाठी स्टिकर किंवा लोगो लावा. भाडेकरूंना ओळखपत्रासह भाडे करारनामा करावा आणि त्याची प्रत आपल्या जवळ ठेवा. तसेच चांगल्या दर्जाचे नाईट व्हिजन सीसीटीव्ही बसवा. संरक्षक भिंतींवर तारांचे कुंपण उभारे, जेणेकरून कोणालाही आत प्रवेश करता येणार नाही.
“या बैठकीत रिटायर्ड सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की, “कॉम्प्लेक्सच्या आवारात मोठी झाडे लावू नयेत, कारण त्यांच्या आडून कोणी लपून घुसण्याचा प्रयत्न करू शकतो. सीसीटीव्ही नियमितपणे तपासा. प्रत्येक फ्लॅटमालकांनी कार्यकारिणी तयार करावी आणि कोणत्याही राजकीय दबावाशिवाय एकजुटीने निर्णय घ्यावेत. प्रत्येक रहिवाशाचा फोन नंबर यादीत ठेवून सतत संपर्कात राहावे.”
ही बैठक 10 जुलै रोजी शेजारील श्रीजी निसर्ग आणि कृष्णा धाममध्ये सिनेस्टाईलने झालेल्या चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे महिला आणि मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. म्हणून या बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी सतीश केसरकर, अतुल सुर्वे, सुरेंद्र गायकर, वैभव खंडागळे, मोहन तांबे, काजल सरकार, संगीता भडवळकर, कल्पना कोंडवले आदींनी सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. बैठकीत 51 महिला-पुरुष रहिवाशी सहभागी झाले
या बैठकीत “श्रीजी स्क्वेअर समन्वयक कमिटी” पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली:
सी विंग:
1. शिवाजी जगताप (605) –
2. नरसिंग खेडेकर (706) –
3. सुरेंद्र गायकर (501) –
4. उत्तम पाटील (505) –
5. विद्याधर राणे (601) –
डी विंग:1.
विजय गायकवाड (309) –
2. रवी साहू (407) –
3. किरण रोठोड (302) –
4. संतोष कोंडवले –
5. वैभव खंडागळे (106) –
ई विंग:1. अतुल सुर्वे (303) – 2. गणेश कोळेकर (301)3. प्रकाश काजरे (201) –4. रवींद्र जाधव (404) –
.रिटायर्ड सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांचा सत्कार अशोक डेरवणकर यांनी केला तर पोलीस निरीक्षक योगेश बेंडकुळे यांचा सत्कार दत्ता पाठारे यांनी केला.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार विजय गायकवाड यांनी केले.रहिवाशांच्या सुरक्षेसाठी अशा स्वरूपाच्या उपक्रमांमुळे निश्चितच परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.