📅 दि. १६ जून २०२५✍️ प्रतिनिधी – बालाजी गायकवाड, प्रकाशपर्व न्यूज
कंधार (जि. नांदेड) – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कंधार आगारामध्ये आज नवीन बसगाड्यांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन माजी खासदार व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण पाटील चिखलीकर, डागे मामा, खरेदी-विक्री संघाचे सभापती किशनराव डफडे सर आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी आगारप्रमुखांच्या वतीने प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा हार घालून सत्कार करण्यात आला.
आपल्या भाषणात चिखलीकर साहेब म्हणाले,> “एसटी ही गोरगरिबांची जीवनवाहिनी आहे. सगळ्यात गरीब कुटुंबातील माणूस सुद्धा एसटीने प्रवास करतो. आंदोलन, मोर्चे वा अन्य प्रसंगी अनेकदा एसटी बसवर दगडफेक होते, जी पद्धत अत्यंत चुकीची आहे. ही वाहने आपल्यासाठी आहेत आणि त्यांचा उपयोग विधायक कारणासाठीच व्हावा, हीच माझी मनोकामना आहे.”

ते पुढे म्हणाले, “एसटीचं उत्पन्न वाढणं गरजेचं आहे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.”कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन अभय वाढवे सर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात आश्वासन दिलं की,> “महाराष्ट्र राज्यातील एसटी विभागात कंधार आगाराचा क्रमांक १ करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन.”

या सोहळ्याला अनेक स्थानिक नागरिक, अधिकारी, कर्मचारी आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.