आमच्या विषयी
प्रकाशपर्व न्युजची कहाणी आणि उद्दिष्टे
आमच्या विषयी
प्रकाशपर्व न्युज: आवाज वंचित बहुजनांचा
प्रकाशपर्व न्युज – एक लढवय्या प्रवासाची सुरुवात – १० मे २०१८ हा दिवस आम्हा सर्वांसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला. समाज परिवर्तनाच्या लढ्यात अखंडपणे झगडणाऱ्या आणि लाखो वंचितांचे आधारस्तंभ ठरलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ऍड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या शुभहस्ते “प्रकाशपर्व न्युज” या डिजिटल माध्यमाचे उद्घाटन झाले आणि एका नव्या युगाचा प्रारंभ झाला.
“प्रकाशपर्व” हे नावच स्वतः एक आशय घेऊन येते — अंध:कारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून जाणीवेकडे, उपेक्षेपासून सन्मानाकडे आणि अन्यायातून न्यायाकडे वाटचाल करणारा प्रवास. ही चळवळ माध्यमांच्या माध्यमातून घडवायची होती — म्हणूनच ‘प्रकाशपर्व न्युज’चा जन्म झाला.

मिशन
वंचित, बहुजन, आदिवासी, महिला व इतर उपेक्षित घटकांचे प्रश्न, संघर्ष आणि यशोगाथा समाजासमोर मांडणे.
व्हिजन
असे समाजमाध्यम बनणे जे प्रत्येक वंचित व उपेक्षित व्यक्तीच्या हक्काचा आवाज बुलंदपणे जगापर्यंत पोहोचवेल.
मूल्य
शोषितांच्या दुःखाशी तादात्म्य राखून त्यांच्या भावना समाजासमोर मांडणे.
