शहाड: राष्ट्रीय महामार्ग ६१ वर असलेल्या शहाड उड्डाणपुल रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती झाली आहेयामुळे वाहनचालक व प्रवाशांना खूप त्रास होतोय.
शहाड उड्डाण पुलावरून दररोज अनेक वाहनांची रहदारी असते,

अवजड वाहने, बस,स्कूल बस,कार, दुचाकी, मालवाहतूक गाड्या, त्यासोबतच प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला शहाड उड्डाणपूल याची अशी झालेली अवस्था पाहून रोजचे प्रवासी संतप्त झाले आहेत.
एक आठवड्यापूर्वी शहड उड्डाणपुलावर रस्ता डांबरीकरण करण्यात आले होते, परंतु एका पावसातच हे डांबरीकरण वाहून गेले आणि उड्डाणपुलाची बिकट अवस्था झाली आहे.

लोकप्रतिनिधींनी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी खड्डे बुजवण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करावी,
खड्डे बुजवले गेले नाही तर अपघात घडण्याची शक्यता आहे
याला जबाबदार प्रशासन राहील
असे मत एका प्रवासी नागरिकाने व्यक्त केले.
