हसनापूर (ता. बाळापुर) | दिनांक १० जुलै २०२५
भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा अंतर्गत बाळापुर तालुक्याच्या वतीने धम्मप्रसारासाठी आयोजिलेल्या प्रवचन मालिकेच्या पहिल्या सत्राचा शुभारंभ हसनापूर येथे आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा आणि वर्षावासाचे महत्त्व या विषयावर करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा बाळापुर तालुका अध्यक्ष राहुल इंगळे यांनी केले. प्रारंभी उपासक-उपासिकांनी आदर्श पूजन करून त्रिशरण व पंचशील ग्रहण केले. त्यानंतर ग्रंथवाचनाचा कार्यक्रम झाला. ग्रंथवाचक बबीता ताई किशोर निखाडे व शिल्पा ताई किशोर निळकंठ यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र धम्मग्रंथाचे पठण केले.यानंतर अध्यक्ष राहुल इंगळे यांनी “आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा आणि वर्षावासाचे महत्त्व” या विषयावर सविस्तर आणि प्रेरणादायी प्रवचन दिले. उपस्थित उपासक-उपासिकांना या पर्वाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, बौद्ध परंपरेतील स्थान आणि सामाजिक कार्यातील भूमिका समजावून सांगितली.
कार्यक्रमात तालुका हिशोब तपासनीस सागरभाऊ निखाडे, तालुका संघटक दादारावजी वानखडे, अनिकेत निखाडे यांनी ग्रंथवाचकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच, हसनापूर येथील उपासक-उपासिकांनी आलेल्या सर्व भारतीय बौद्ध महासभा टीमचे पुष्प देऊन स्वागत केले.
या वेळी किशोर निळकंठ, समाधान निळकंठ, प्रशिक निळकंठ, शेषराव निळकंठ, मंगेश निळकंठ, साहेबराव निळकंठ, दीपमाला निळकंठ, छायाताई भोजने, अश्विनी ताई शिरसाट, सत्यभामा निळकंठ, जिजाबाई निळकंठ यांच्यासह गावातील बहुसंख्य उपासक-उपासिका व बालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप सरनत्तय घेऊन शांततेत करण्यात आला.
बाळापुर प्रतिनिधी : रामचंद्र नावकर