बदलापूर प्रतिनिधी – विजय धों. गायकवाड
ठाणे – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई तसेच कोकण विभागीय माहिती कार्यालय यांच्या वतीने “पत्रकारितेची पाठशाळा – बातमी मागाची गोष्ट” या विशेष कार्यशाळेचे आयोजन ११ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता के. नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महापालिका येथे करण्यात आले आहे. ही कार्यशाळा पत्रकार व माध्यम प्रतिनिधींसाठी मार्गदर्शनपर व ज्ञानवर्धक ठरणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन हेमराज बागुल, संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२), ठाणे महानगरपालिका, ठाणे व प्रशांत रोडे, उपायुक्त (माहिती), ठाणे महानगरपालिका, ठाणे हे उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाला अर्चना शरमस्कर, उपसंचालक (माहिती), कोकण विभागीय माहिती कार्यालय, व देवेंद्र भुजबळ, निंनुत संचालक (माहिती) हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील.डॉ. मोना पंकज, प्रेरणादायी वक्त्या आणि विजयकुमार कुटी, पर्यावरण तज्ज्ञ हेही आपले विचार मांडणार आहेत.कार्यक्रमासाठी कैलास सखाराम सपकाळ, संजय तितकरे, अशोक सामंत, मोझो जानमाळदार, उमेश बिरारी, विवेक सोनावणे, अश्विन बळाले, राजेश थापर, रोहित मानेकर यांचा विशेष सहभाग असणार आहे.या कार्यशाळेचे आयोजन ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे पत्रकार संघ, ठाणे दैनिक पत्रकार संघ, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संस्था, ठाणे महापालिका व इतर संबंधित संस्थांनी संयुक्तपणे केले आहे.पत्रकारिता क्षेत्रातील नवोदित व कार्यरत पत्रकारांसाठी ही कार्यशाळा एक प्रेरणादायी पर्वणी ठरणार आहे.
