डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विविध एक महिना व दोन महिने कालावधीचे १) अप्लाइड आर्टिफिशीयल इंटेलिजेंस रोबोटिक्स आणि आय.यो.टी वर आधारित २) डिजिटल मार्केटिंग वर आधारित अनिवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा की अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतींनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करावा किंवा या तांत्रिक माहितीच्या आधारे रोजगार मिळवावा.
सदर प्रशिक्षणात संबंधित विषयाचे प्रॅक्टिकल सह तांत्रिक ज्ञान तसेच उद्योजकीय ज्ञान जसे उद्योग उभारणी कशी करावी, शासकीय कर्जविषयक /अनुदान योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल, विक्री कला, उद्योग व्यवस्थापन, उद्योगांना भेटी, कर कायदा लायसन याविषयीची माहिती इत्यादी बाबींविषयी तज्ञ मार्गदर्शकाद्वारे प्रशिक्षण दिल्या जाईल,
सदर प्रशिक्षणासाठी लाभार्थीची निवड प्रत्यक्ष मुलाखती द्वारे केली जाणार आहे. प्रशिक्षणासाठी लाभार्थी हा 18 ते 45 वयोगटातील असावा, तो अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, किमान १० वी पास, एक महिना व अभियांत्रिकी, पॉलीटेक्निक,एमसीए, बीसीए, एमएससी, बीएससी दोन महिने कालावधीच्या प्रशिक्षणा करिता शिक्षण घेतलेले असावे, तो गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच स्वतःचा स्वयंरोजगार / रोजगार करण्याची तयारी असावी. प्रवेश अर्जासोबत आधार कार्ड, फोटो, स्वतःचा जातीचा दाखला, अंतिम सत्र गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे.
तरी इच्छुक व्यक्तींनी दिनाक २४ फरवरी २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, सामाजिक न्याय भवन दिक्षाभूमी रोड, शासकीय आयटिआय समोर, नागपूर येथे एक दिवशिय परिचय मेळावा आयोजित केलेला आहे.
अधिक माहिती करिता संगीता ढोणे मोबाइल क्रमांक ९१६८६६७१७९ यांचेशी संपर्क साधावा किंवा एमसीडीच्या वेबसाईट www.mced.co.in/Barti या link वर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन एच. आर. वाघमारे विभागीय अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर विभाग, नागपूर यांनी केले आहे.



