प्रकाश पर्व न्यूजपरभणी प्रतिनिधी – पंकज चव्हाण
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रधेय बाळासाहेब आंबेडकर व युवा आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध जाती-धर्मातील युवकांनी आज वंचित बहुजन युवा आघाडीत जाहीर प्रवेश केला.
हा भव्य पक्षप्रवेश सोहळा आज दिनांक ९ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता सारनाथ बुद्ध विहार, सारनाथ कॉलनी, धारा रोड, परभणी येथे पार पडला. या सोहळ्याचे आयोजन परभणी जिल्हा (उत्तर) युवक अध्यक्ष गणेश गाढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ, विभागीय प्रशिक्षक डॉ. सुरेश शेळके, जिल्हाध्यक्ष (उत्तर विभाग) तुकाराम भारती, जिल्हा महासचिव शिवाजीराव वाकळे, जिल्हा महासचिव गौतम रणखांबे, तालुका अध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे, शहराध्यक्ष रणजीत प्रकरण, महिला जिल्हाध्यक्ष सुनीताताई साळवे, माजी जिल्हा उपाध्यक्ष संदीप खाडे, पंकज चव्हाण (कुऱ्हाडी) आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनात आणि उत्स्फूर्त सहभागात हा पक्षप्रवेश सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेशी निष्ठा व्यक्त केली.
प्रकाश पर्व न्यूज आवाज वंचित बहुजनांचा