बदलापूर प्रतिनिधी :-विजय धों गायकवाड

कुर्ला, – उत्तर-मध्य मुंबई जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक ११ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता बुद्ध कॉलनी, स.गो. बर्वे मार्ग, कुर्ला (प.) येथे पक्षाच्या नामफलक अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयु. चेतन आहीरे (अध्यक्ष – मुंबई प्रदेश), आयुष्यमती स्नेहल सोहनी (महिला अध्यक्ष – मुंबई प्रदेश), तसेच आयु. संतोष आमुलगे (महासचिव – उत्तर-मध्य मुंबई) हे उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमासाठी सर्व जिल्हा, तालुका आणि वार्ड कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभाग समन्वयक रविंद्र काशिनाथ भोसले (वार्ड क्र. १६७) यांनी केले आहे.