
बदलापूर प्रतिनिधी -विजय धों गायकवाड
दि.१० जुलै रोजी जिल्हा परिषद शाळा ढोके दापिवली शाळेत गुरु सन्मान करणारा गुरु पौर्णिमा सण विद्यार्थी मित्रांनी एकत्रित नियोजन करून उत्साहात साजरा केला.या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.प्रतिमा पूजन हे शाळा व्यवस्थापन समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ अश्विनी ताई गायकर व उपाध्यक्षा सौ.शालिनीताई माळी यांनी केले.गुरुपौर्णिमेचे प्रास्ताविक व गुरूचे महत्त्व शाळेचे मुख्याध्यापक श्री.शंकर झाडबुके सर यांनी सांगितले.शाळेचे नवोपक्रमशिल प्राथमिक शिक्षक श्री आनंद सोनकांबळे सर यांनी गुरुमहिमा परंपरा, गुरु महात्म्य,पूर्वीची शिक्षण पद्धती व आताची तंत्रज्ञान युक्त आधुनिक शिक्षण पद्धती यामधील तफावत व प्रगती टप्पे विद्यार्थी बालमित्रांना समजावून सांगितले.गुरु पौर्णिमा निमित्त विद्यार्थ्यांना आपल्या व आपल्या परिवाराची काळजी घेण्यासाठी जनजागृती पर डेंग्यू,हिवताप,मलेरिया, चिकुनगुनिया इ.डासांपासून होणाऱ्या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी सोनावळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहायक आरोग्य सेवक श्री.जाधव भाऊसाहेब यांनी सविस्तर माहिती दिली.गुरु पौर्णिमा सण हा *”कृतज्ञता व महत्त्वकांक्षा निश्चय दिवस”* म्हणून साजरा करतांना शाळेत विद्यार्थी मित्रांसाठी वक्तृत्व,निबंध व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे परिक्षक म्हणून शाळेचे नवोदित शिक्षक श्री.संदिप मिसाळ सर, स्वयं सेवक शिक्षिका सौ.राखी भोईर व रत्ना टिचर यांनी निःपक्षपातीपणे केले.शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा व उपाध्यक्षा दोन्ही ताईंनी आपल्या मनोगतात समस्त शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.शाळेचे मुख्याध्यापक श्री.झाडबुके सरांनी विद्यार्थी मित्रांसाठी मध्यान्ह भोजनासाठी जिलेबी हा गोड पदार्थ आणला होता.विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारा मजकूर लिहून भेटकार्ड बनवून,पेन भेट देऊन शिक्षकांना वंदन केले.गुरु सन्मानार्थ विद्यार्थ्यांनी स्वयं स्फूर्तीने खो-खो चा सामना आयोजन केले होते.गुरु पौर्णिमा निमित्त शिक्षकांना एकत्रित करत केक कापून गुरु पौर्णिमा सण उत्साहात साजरा केला.सर्वांना केक व खाऊ वाटप करण्यात आला.या कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी (सानेगुरुजी शाळा) व (आदर्श विद्या मंदिर बदलापूर शाळा,) यांनी शिक्षकांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देत आशिर्वाद घेतले.वंदन केले.सरते शेवटी गुरु पौर्णिमा सण कार्यक्रमात सहभागी झालेल्या उपस्थित सर्व मान्यवर अतिथीचे, उपस्थितांचे स्वागत करत शतशः धन्यवाद शाळेचे सेवा जेष्ठ शिक्षक श्री पांडुरंग पाटील सर यांनी मानले.
