हिंगोली प्रतिनिधी | वैभव गौतम मोरे
हिंगोली : मौजे पहेणी ता.जि. हिंगोली या गावामध्ये मागीलएका महिन्यापासून खास करून दलितवस्ती मध्ये तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रात्री-बेरात्री गावशिवाराच्या आजूबाजूला भटकंती करून ही पिण्याचे पाणी मिळत नाही. गावामध्ये नियमित व पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने लहान मुले, महिला तसेच जेष्ठ नागरिक व सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून दैनंदिन वन विस्कळीत झाले आहे.

गावात अनेक वर्षापासून ग्रामपंचायत व शासनाने बोर व विहीर पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे अधिग्रहण केलेले आहे. परंतु सदरील अधिग्रहण केले. बोर – विहीर शेती सिंचना साठी वापरात आहेत.
सदरील बोर – विहीर ज्या शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत. त्या सर्व बोर – विहार शासनाने ताब्यात घेऊन सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात. सध्या गावातील खास करून बौद्ध व दलित वस्तीसाठी तत्काळ तीन वेळा पिण्याचे टँकर देण्यात यावे. या मुद्यावर निवेदन ग्रामस्थांनी मा. जिल्हाधिकारी साहेब व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अति आवश्यक कारवाईसाठी मा. गटविकास अधिकारी साहेब यांना दि.12/11/2026 रोजी निवेदन दिले.
निवेदन दि.12/11/2026 रोजी देले. तर त्यांनी त्यांचे प्रशासक पाठवले. 13/11/2026 रोजी पंचायत समिती हिंगोली येथील विस्तार अधिकारी (पंचायत) आणि विस्तार अधिकारी (कृषी) यांनी मौजे पहेणी ता. जि. हिंगोली येथील दलित वस्तीत भेट देऊन पाणी टंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपले ‘घागर मोर्चा’ आंदोलन स्थगित केले होते.
🛑 प्रशासनाने दिलेली प्रमुख आश्वासने:
• दोन ते तीन दिवसांत दलीत वस्तीतील दोन बोअर ‘री-बोअर’ (Re-bore) करून देणे, किंवा पाणी न लागल्यास मोहन आनंदा मोरे यांचा बोअर अधिग्रहित करणे.• कायमस्वरूपी उपाययोजना होईपर्यंत ग्रामपंचायतीमार्फत खाजगी टँकरने पाणी पुरवठा करणे.
• ग्रामपंचायत निधीतून 1)बौद्ध विहार 2)दलित वस्ती सभागृह 3)दलितवस्ती स्मशानभूमी या तीन ठिकाणी 5000 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसवणे.
मात्र, चार दिवस उलटूनही अद्याप पाण्याच्या टाक्यांची किंवा पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था झालेली नाही. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता दिलेला शब्द पाळावा. आणि तात्काळ पाण्याच्या टाक्या व टँकरची सोय करावी, अन्यथा ग्रामस्थांना पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.माननीय जिल्हाधिकारी साहेब, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि मा. गटविकास अधिकारी (BDO) यांनी याकडे त्वरित लक्ष द्यावे!
हिंगोली तालुक्यातील पहेणी गावामध्ये पाण्यासाठी योजनेत लाखोंचा निधी खर्च झाल्याचा दावा केला जात आहे, मात्र ग्रामस्थांच्या घरातील नळ कोरडेच आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका हिंगोली तालुक्यातील पहेणी येथील ग्रामस्थांना बसत असून, पाण्यासाठी चार वर्षांपासून सुरू असलेली वणवण थांबलेली नाही.