शिरवळमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; शेतकऱ्याचा २९ एकर ऊस जळून खाक!

दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत शेतकरी पिंटू जाधव यांच्या शेतातील तब्बल २९ एकर उभा ऊस जळून खाक झाला आहे. वीज वाहिन्यांमधील शॉर्टसर्किटमुळे उसाच्या पिकाला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण ऊस पिकाला आगीने वेढले. या दुर्घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.आगीची माहिती मिळताच परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता प्रचंड असल्याने ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडले आणि पाहता पाहता २९ एकरांतील उभा ऊस जळून नष्ट झाला. या घटनेमुळे शेतकरी पिंटू जाधव यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत शेतकरी पिंटू जाधव यांच्या शेतातील तब्बल २९ एकर उभा ऊस जळून खाक झाला आहे. वीज वाहिन्यांमधील शॉर्टसर्किटमुळे उसाच्या पिकाला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण ऊस पिकाला आगीने वेढले. या दुर्घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेत २९ एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पंचनामा करून नुकसानीचा आढावा घ्यावा आणि शेतकऱ्याला शासनाकडून योग्य ती आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला प्रशासनाकडून तातडीने मदत मिळणार का, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. प्रकाश पर्व न्यूज जिल्हा प्रतिनिधी राहुल शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *