अकोल्यात शेतकरी संघटनेचा मोर्चा : दुष्काळ पाहता शेतकरांच्या प्रश्नांसाठी मोर्चा

अकोला | प्रतिनिधी – २०/११/२०२६

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर अकोला येथे शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होत शासनाकडे आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

वर्षी अपुऱ्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पिकांचे योग्य पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, पीकविम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, तसेच दुष्काळग्रस्त भागासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशा प्रमुख मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या.

मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या नेत्यांनी दिला.मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *