करंजवण योजनेमुळे मनमाडकर पाणीटंचाईच्या शापातून मुक्त

मनमाड शहरासाठी ४०० कोटी रुपये खर्चाची करंजवन पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्याने मनमाडकरांची पाणीटंचाईतून सुटका झाली. शहरात सध्या मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. मनमाड शहराला सातत्याने पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत होते. आमदार सुहास अण्णा कांदे यांनी राज्य शासनाकडून ४०० कोटी रुपयांची करंजवन पाणीपुरवठा योजना मंजूर करून ती पूर्णत्वास नेली आहे. शहरात तब्बल दहा-वारा दिवसाच्या अंतराने पाणीपुरवठा केला जाता होता. आता तीन दिवसाआड मुबलक पाणीपुरवठा केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *