-1.3 C
New York

Buy now

spot_img

छेडछाडीला विरोध करणाऱ्या पित्याला बेदम मारहाण – राज्यभरातून संतापाचा उद्रेक; वंचित बहुजन आघाडीची कठोर कारवाईची मागणी

रामकिसन अवधूत, प्रतिनिधी जालना

जालना – शहरातील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. स्थानिक एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करण्यात आली आणि जेव्हा तिच्या पित्याने या विकृत कृत्याला विरोध केला, तेव्हा त्या मुलीच्या वडिलांवरच दोन जणांनी काठ्यांनी बेदम मारहाण केली.

यावेळी केवळ पीडितेच्या वडिलांनाच नाही, तर घरातील महिलांनाही मारहाण करण्यात आली असून, लहान मुलांनाही अमानुषपणे मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेबाबत वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी सांगितले की, “या प्रकाराचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. पीडित कुटुंबावर झालेला अन्याय हा संपूर्ण समाजासाठी लाजिरवाणा आहे. पोलिस प्रशासनाने या गुन्हेगारांवर तत्काळ कठोर कारवाई केली पाहिजे. जर प्रशासनाने वेळेत योग्य पावले उचलली नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.”

या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून देखील होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com