
प्रकाशपर्वन्युज/ सुनिल वाघमारे
शिर्डी: बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा, या मागणीसाठी १७ सप्टेंबर रोजी शिर्डी येथे भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. राहाता तालुक्यातील शिर्डी येथील आनंद बुद्ध विहारापासून ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा शांततेने काढण्यात आला. ‘टेम्पल ॲक्ट, १९४९’ रद्द करण्याची मागणीवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा देशभरात सुरू आहे. याच लढ्याचा एक भाग म्हणून शिर्डीत हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी, ‘टेम्पल ॲक्ट, १९४९’ हा कायदा रद्द करून, महाबोधी महाविहाराचा ताबा पूर्णपणे बौद्धांकडे सुपूर्द करण्यात यावा, असे निवेदन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनाचे औचित्यभारतीय बौद्ध सोसायटीचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

उपस्थित प्रमुख पदाधिकारीनिवेदनावर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते, भारतीय बौद्ध महासभा उत्तरेचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर, वैशालीताई अहिरे यांच्यासह इतर अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या मोर्च्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोलगे, युवा जिल्हाध्यक्ष प्रविण आल्हाट, जिल्हा महासचिव सुनिल वाघमारे, प्रसिद्धी प्रमुख विलास अहिरे, गौतम पगारे, बिपीन गायकवाड, विश्वास जमधडे, अण्णासाहेब जगताप, अतिष त्रिभुवन, ॲड. अनिल शेजवळ, भीमराव कदम, विजय भातनकर आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.



