-1.3 C
New York

Buy now

spot_img

नांदेड जिल्ह्याचा अभिमान – मुगट नगरीचा सुपुत्र वैभव माधव हाटकर यांचे सुवर्ण यश

प्रतिनिधी-प्रकाश गवारे

मुगट नगरीचे सुपुत्र वैभव माधव हाटकर यांनी आपल्या दमदार खेळातून जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत हार्दिक सुपर हेव्हीवेट गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. त्यांच्या या भव्य कामगिरीने नांदेड जिल्ह्याचा क्रीडा इतिहास उजळला असून, संपूर्ण जिल्ह्यात आनंद व अभिमानाची लहर पसरली आहे.

वैभव हाटकर यांनी स्पर्धेत उत्कृष्ट लढाऊ वृत्ती, मेहनत आणि खेळातील जिद्द दाखवत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत सुवर्ण यश संपादन केले. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, “नांदेडच्या भूमीतूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतात” याचे ज्वलंत उदाहरण त्यांनी साकारले आहे.
या यशानंतर क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले की, वैभव हाटकर यांच्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावण्याची मोठी क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाल्यास ते भारताचे नाव उज्ज्वल करू शकतात.
स्थानिक नागरिक, मित्रपरिवार, क्रीडा प्रशिक्षक आणि ग्रामस्थांनी वैभव हाटकर यांचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या या सुवर्ण कामगिरीमुळे अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील क्रीडा विश्वासाठी ही एक अभिमानास्पद घटना ठरली असून, वैभव हाटकर यांनी केलेली कामगिरी हे कष्ट, जिद्द आणि चिकाटीचे प्रतीक असल्याचे सर्वत्र गौरविले जात आहे.

प्रतिनिधी -प्रकाशपर्व न्युज नांदेड जिल्हा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com