
प्रकाशपर्व न्युज नांदेड प्रतिनिधी : धम्मा कांबळे
जळगाव : दि. 21/09/2025 रोजी जळगाव शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा संवाद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यकर्त्यांना प्रेरित करताना त्यांनी आवाहन केले की, “आपल्याला लढा एकत्र येऊन लढायचा आहे आणि एकत्र लढूनच हा लढा जिंकायचा आहे.” त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश व आत्मविश्वास निर्माण झाला.या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील, पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. युवकांचा सहभाग आणि उत्साहामुळे मेळाव्याला विशेष उर्जा मिळाली.
या मेळाव्याच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांनी संघटनात्मक बांधिलकी अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला.




