-1.3 C
New York

Buy now

spot_img

राष्ट्रवादीचे विद्यमान उपसरपंच नितीन कदम यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन युवा आघाडीत प्रवेश

अहमदनगर (प्रतिनिधी – सुनिल वाघमारे

राहुरी तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान उपसरपंच नितीनभाऊ कदम यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन युवा आघाडीत जाहीर पक्षप्रवेश केला.

हा पक्षप्रवेश कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजी युवा जिल्हाध्यक्ष मा. प्रविणभाऊ आल्हाट व जिल्हा महासचिव मा. सुनिलभाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. या प्रवेशामध्ये मराठा व ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांचा देखील समावेश झाला.

कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नेते पिंटूनाना साळवे यांनी केले होते. यावेळी जि. उपाध्यक्ष बबलू पगारे, राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके, प्रसारमाध्यम प्रमुख विलास अहिरे, शिर्डी शहराध्यक्ष बाळाभाऊ गायकवाड, अक्षय बनसोडे, कमलभाई शेख, आकाश दिवे, इमरानभाई शेख (राहुरी शहराध्यक्ष), सामाजिक कार्यकर्ते सचिन साळवे, पत्रकार साळवेसाहेब व परदेशीसाहेब, भगिनी आयनोर पठाण तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन कार्यकर्त्यांचा प्रवेश हा फक्त ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, श्रद्धेय साहेबांचे नेतृत्व मान्य केल्यामुळेच झाल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

कार्यक्रमाचा समारोप आभारप्रदर्शनाने झाला. आभार प्रदर्शन संतोष चोळके यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com