
म्हसदी (ता. साक्री) या छोट्याशा गावातून समाजसेवेची मोठी वाटचाल करणारे, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून नावारूपास आलेले दिपक रत्नाकर दिक्षित (गणु महाराज) यांचा उत्तर महाराष्ट्र ब्राह्मण समाजाच्या भव्य मेळाव्यात धुळे येथे सन्मानपत्र व स्नेहवस्त्र देऊन गौरव करण्यात आला.
हा मेळावा परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परशुराम युवा मंच व परशुराम सखी मंचातर्फे धुळे येथील कमलाबाई कन्या शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान परशुराम महामंडळाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून कॅबिनेट मंत्री दर्जाचे श्री. आशिष दामले त्यांचे हस्ते गणु महाराजांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी साक्री तालुका ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री. सुनिल जोशी, उपाध्यक्ष श्री. हेमंत भंडारी, सचिव श्री. संजय दिक्षित, कार्याध्यक्ष श्री. उमाकांत देशपांडे (PWD), डॉ. निलेश माळीचकर, श्री. बापूराव पाठक, श्री. संदीप भट, श्री. अरुण जोशी, श्री. प्रफुल अग्नीहोत्री, श्री. सोनू चंद्रात्रे, श्री. चंद्रकांत पंचमभाई आदी मान्यवर उपस्थित होते.
“समाजसेवेची ओळख – गणु महाराजांचे कार्य प्रेरणादायी”
🌿 समाजसेवेत अखंड योगदान
गेल्या 18 वर्षांपासून गणु महाराज हे दानशूरता आणि सेवाभावाचे जिवंत प्रतीक ठरले आहेत. जात, धर्म, ओळख न बघता प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मदतीसाठी ते सदैव पुढे असतात.
कोरोना महामारीच्या काळात त्यांनी गावातील गरीब रुग्णांच्या औषधोपचारांचा संपूर्ण खर्च उचलला, तसेच आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून समाजसेवेचे मोठे उदाहरण घालून दिले.
एस.टी. महामंडळाचा संप सुरू असताना ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचे वेतन थांबले असताना, गणु महाराजांनी मालेगाव, साक्री आणि धुळे बसस्थानकांवर प्रत्येकी तीन हजार रुपयांचे किराणा किट वाटप करून मानवतेचा आदर्श ठेवला.
🏆 अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी
त्यांच्या निस्वार्थ समाजसेवेच्या कार्याची दखल घेऊन गणु महाराज यांना शासन आणि विविध सामाजिक संस्थांकडून 300 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व लंडन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. याशिवाय राष्ट्रीय पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरविण्यात आले आहे.
✨ मानवतेचे आधारस्तंभ
म्हसदी गावात “कोणीही मदतीसाठी येतो आणि रिकाम्या हाताने परत जात नाही” हे वाक्य आज गणु महाराजांमुळे सत्य ठरले आहे. त्यांचा समाजसेवेचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असून, गावाच्या आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या अभिमानाचे कारण ठरला आहे.
तालुका प्रतिनिधी विजय अहिरे



