तालुका प्रतिनिधी विजय अहिरे

नाशिक : अॅग्रोकेअर ग्रुप ऑफ कंपनीज अंतर्गत अॅग्रोकेअर कृषीमंच, नाशिक यांच्या वतीने आयोजित “गौरव महाराष्ट्राचा” पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक, कृषी व जनसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिपक रत्नाकर दीक्षित (गणु महाराज) यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा भव्य सोहळा १७ वा राष्ट्रीय महा ॲग्रो आयडॉल अवॉर्ड व महाराष्ट्र आयडॉल अवॉर्ड २०२५ अंतर्गत हॉटेल देवी इंटरनॅशनल, पंचवटी, नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पुरस्कारार्थी, शेतकरी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मा. डॉ. नमिता कोहक (Mrs. Global United Elite – Lifetime Queen, USA) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. कैलाश मोते साहेब, संचालक, फलोत्पादन, महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, पुणे हे होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मा. श्री. भूषण निकम, अध्यक्ष – अॅग्रोकेअर ग्रुप ऑफ कंपनीज, नाशिक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
दिपक रत्नाकर दीक्षित (गणु महाराज) यांनी समाजहित, कृषी मार्गदर्शन व जनजागृतीच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी अॅग्रोकेअर कृषीमंच व आयोजकांचे आभार मानत, पुढील काळातही समाजासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे आयोजन रोहिणी पाटील (अॅग्रोकेअर कृषीमंच, नाशिक) यांनी केले होते. हा सन्मान सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.



