16.9 C
New York
मंगळवार, जून 17, 2025

Buy now

spot_img

टीम वाकोच्या आमरण उपोषणाला संविधान फाऊंडेशनचा ठाम पाठिंबा!

वाघोली (प्रतिनिधी: संतोष कदम)

वाघोली परिसरातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी “वाघोली अगेन्स्ट करप्शन ऑर्गनायझेशन” (वाको) या सामाजिक संघटनेच्या वतीने आय. व्ही. इस्टेट परिसरातील निकृष्ट व असुविधाजनक ड्रेनेज व्यवस्थेच्या विरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणासाठी वाको संघटनेचे प्रतिनिधी अनिलकुमार मिश्रा हे मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषणावर बसले आहेत.

या उपोषणाला सामाजिक न्याय व लोकहितासाठी सतत कार्यरत असलेल्या संविधान फाऊंडेशन तर्फे ठाम पाठिंबा देण्यात आला आहे. संविधान फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष ॲड. किशोर राजगुरु यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा देण्यासाठी फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी उपोषणस्थळी भेट दिली.

यावेळी संविधान फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. रविंद्र साळवे, खजिनदार पोपट गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष आणि संविधान फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष हिराभाऊ वाघमारे, तसेच संस्थापक सदस्य सर्जेराव वाघमारे हे देखील उपस्थित होते. त्यांनी वाकोच्या आंदोलनाचे समर्थन करत संबंधित प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली.

अनिलकुमार मिश्रा यांनी सांगितले की, “वाघोली परिसरातील नागरिक अनेक दिवसांपासून ड्रेनेज व पायाभूत सुविधा अभावामुळे त्रस्त आहेत. वारंवार निवेदने दिल्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे हे उपोषण सुरू करण्याची वेळ आली.”

संविधान फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. राजगुरु सर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जनतेच्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत संविधान फाऊंडेशन व वंचित बहुजन आघाडी वाको संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.”

या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com