✍🏻रोहित कांबळे | प्रकाशपर्व न्यूज, पुणे शहर
पुणे – पुणे शहर व उपनगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्यांच्या वाढत्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले होते. अनेक पोलिस ठाण्यांमध्ये नोंद झालेल्या घरफोड्यांचा छडा लावण्यात कोंढवा पोलिसांना मोठे यश मिळाले असून १५० पेक्षा जास्त घरफोड्यांमध्ये गुंतलेला अर्जुनसिंह गोकुलसिंह दुधाणी (वय ४७, रा. उत्तरप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.
कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. शहरातील कोथरूड, हडपसर, कात्रज, नळस्टॉप, औंध, कोंढवा आदी परिसरांमध्ये घरफोडी करून सोनं, रोख रक्कम, दागिने, महागडी इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरणाऱ्या ‘ग्राही’ टोळीचा हा प्रमुख सूत्रधार होता.

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून अंदाजे ३५ तोळे सोने, २ मोटारसायकल, आणि काही मोबाईल फोन असा एकूण सुमारे २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आरोपी अत्यंत हुशारीने घरातील CCTV कॅमेरे टाळून चोरी करत असे, तसेच त्याने विविध बोगस नावाने सायबर कॅफेमधून रेल्वे तिकीट आणि SIM कार्ड्स खरेदी केल्याचे उघड झाले आहे.
आरोपीविरुद्ध देशातील इतर राज्यांतील पोलिस ठाण्यांतही गुन्हे दाखल आहेत.

पोलीस यंत्रणेचे कौतुक या यशस्वी कारवाईमुळे पुणे शहरात गेल्या काही काळात झालेल्या अनेक घरफोड्यांचे धागेदोरे एकत्र जोडले गेले आहेत. कोंढवा पोलिसांची ही कामगिरी इतर पोलिस विभागांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

अर्जुनसिंह सध्या पोलिस कोठडीत असून त्याच्याकडून आणखी माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शहरातील नागरिकांनी आपल्या घरी CCTV, अलार्म सिस्टम बसवाव्या व शंकेस्पद हालचाली दिसल्यास तात्काळ नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.
🕵️ तुम्ही सुरक्षित, शहर सुरक्षित
– प्रकाशपर्व न्यूज, पुणे शहर
📍 संपर्क: ९३२२८१८५१४