
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ व इम्तियाज जलील यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप व शाब्दिक चकमक चालू आहे, हे प्रकरण आता हाणामारी पर्यंत पोहचले आहे
संजय शिरसाठ यांचे समर्थक विजय दिलीप चाबुकस्वार वय 27 रा. ब्रिजवाडी यांनी तक्रारीत असे नमुद केले की त्यांनी संजय शिरसाठ यांच्या समर्थनात सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली होती त्या पोस्ट मध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर अप्रत्यक्ष टिका सुध्दा केली होती याचा राग मनात धरून इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी त्यांनां मारहाण करण्यात आली
दुसर्या बाजूने सुध्दा तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यांनी तक्रारीत आमचा वाद वैयक्तिक व शेजारीआहे गेल्या अनेक दिवसांपासून आमच्यात शाब्दिक वाद होत होता परंतु काल आम्हाला संजय शिरसाठ समर्थकांनी मारहाण केली त्यानुसार विजय दिलीप चाबुकस्वार व ईतरांवर MIDC सिडको पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे



