पिंपरी-चिंचवड (ता. १० जुलै) –
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अनिल अण्णा जाधव यांचा वाढदिवस समाजहिताचे भान राखत वाकड येथील त्यांच्या कार्यालयासमोर साजरा करण्यात आला. या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील ४५० विद्यार्थ्यांना सायकली तर ५०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार फुलस्केप वह्यांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मा. राहुलदादा कलाटे व डॉ. जाधव यांच्या मातोश्री सौ. बेबीताई नारायण जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सर्वजित बनसोडे, पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, युवा उद्योजक संजय जाधव, पिंपरी-चिंचवड महासचिव संजीवन कांबळे, विश्वास गदादे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमातून डॉ. अनिल अण्णा जाधव यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श समोर ठेवत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. उपस्थितांनी त्यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
प्रकाश पर्व न्यूज आवाज वंचित बहुजनांचा
मुख्य संपादक प्रकाशपर्व न्यूज : अजय जाधव