-5 C
New York

Buy now

spot_img

म्हसदी : आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महिला पालक मेळावा उत्साहात पार

तालुका प्रतिनिधी विजय अहिरे

म्हसदी येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये काल महिला पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रूपाली शिशिर काकुळते तर प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय केंद्रप्रमुख सौ. सीमा वाघ उपस्थित होत्या. यावेळी सौ. जयश्री महेंद्र नेरे, सौ. मनीषा भटू श्रीराम, सौ. कमलबाई लोटन पाटील, सौ. अर्चना गणेश ठाकरे, सौ. वर्षा उमेश बेडसे यांचीही उपस्थिती लाभली.

मेळाव्यात पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह शंका व समस्यांचे मोकळेपणाने मांडणी केली. केंद्रप्रमुख सौ. सीमा वाघ मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत पालकांच्या भूमिकेचे महत्त्व सांगताना स्वावलंबी व संस्कारी पिढी घडविण्यासाठी आवश्यक सवयींबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची प्रगती पाहून त्यांनी शाळेचे विशेष कौतुकही व्यक्त केले.

शाळेचे प्राचार्य श्री. दिनेश देवरे सर व श्री. दिपक सावळे सर यांनी पालकांशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले. शिक्षक–पालक समन्वयामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीला गती मिळते, यावर त्यांनी भर दिला. शाळेतील शिक्षकांनीही पालकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.

मेळाव्याचे उत्कृष्ट सूत्रसंचलन कु. निकिता देवरे यांनी केले. तसेच सौ. भावना देवरे, सौ. आरती मॅडम, सौ. प्रियंका पोतदार मॅडम यांनी आपली मते मांडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. वैशाली देवरे, सौ. दिपाली देवरे, सौ. वंदना देवरे, सौ. रिंकल देवरे, सौ. विना शिंपी, सौ. नयन पाटील, कु. सलोनी देवरे, सौ. स्वरनिमा गिरासे, सौ. रीना गवळी, सौ. सविता कुंवर, सौ. अर्चना जाधव, श्री. पंकज जाधव, श्री. राकेश देवरे, श्री. विशाल नेरे, श्री. हरीश नेरे, श्री. अश्रफ पिंजारी व श्री. योगेश खैरनार यांनी विशेष सहकार्य केले.मेळाव्यानिमित्त नुकत्याच पार पडलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व बक्षिसे प्रदान करण्यात आली

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com