
कल्याण प्रतिनिधी: प्रदीप जाधव
जालना : धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने समाजबांधवांनी मोर्चा काढला.
या मोर्चाचे नेतृत्व धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी केले. समाजाला न्याय मिळावा, आरक्षणाच्या अंमलबजावणीस विलंब का केला जातो, याबाबत त्यांनी शासनाला जाब विचारला.

मोर्चादरम्यान विविध घोषणा देत समाजबांधवांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. “आरक्षण हा आमचा हक्क आहे, तो आम्हाला हवा” अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा समाजाने दिला.



