प्रकाशपर्वन्युज.संगमनेर/वैभव मोकळ

दिनांक २४ सप्टेंबर संगमनेर तालुक्यातील, डिग्रस गावाचे सुपुत्र सामाजिक चळवळीतील बाळासाहेब संपत भालेराव यांचा अनोखा उपक्रम, आईच्या मृत्यू नंतर दहावा, तेरावा, कोणत्याही प्रकारचा विधी न करता, जिल्हा परिषदेच्या शाळेला एक्कावन्न हजार रुपयांची देणगी दिली.बाळासाहेब भालेराव यांच्या मातोश्री शोभाबाई संपत भालेराव यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले होते, त्यांच्या दशक्रिया विधिला खर्च करण्या ऐवजी गरजू शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला उपयोग व्हावा, हा निश्चय करत शाळेला ५१,००० हजाराची देणगी देऊन समाजाला एक वेगळाच संदेश दिला.बाळासाहेब भालेराव हे संगमनेर येथील ज्ञानमाता कॉलेज मधे टेंडर पद्धतीने अल्पशा मानधनावर कार्यरत असतांना देखिल त्यांनी उच्चप्रतीचा निर्णय घेऊन, एक अनोखा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून सर्वांनीच, मनुषाच्या मृत्यू नंतर जगाला देखावा करण्या ऐवजी असे उपक्रम राबवावेत. म्हणजे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला खूप मोठा हातभार लागेल.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक घोडकेसर, पवारसर, होडगरसर, माळवेसर, मधेसर, रावसाहेब हाळणोरसर, भालेरावसर, तसेच महामुनी मॅडम, जाधव मॅडम, सर्व शिक्षक वृंद यांचे उपस्थिती मधे हि देणगी सुपूर्द करण्यात आली.



