0.4 C
New York

Buy now

spot_img

जीवनातील नैराश्यावर ग्रंथवाचन हा उत्तम पर्याय : प्राचार्य संजीव गिरासे

विजय अहिरे तालुका प्रतिनिधी

म्हसदी :
वाचन ही व्यक्तिमत्व घडविण्याची मूलभूत प्रक्रिया असून ग्रंथवाचनातून व्यक्तीचे विचार सकारात्मक आणि समृद्ध होतात. जीवनातील नैराश्यावर ग्रंथवाचन हा उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन प्राचार्य प्रा. डॉ. संजीव गिरासे यांनी केले.

आदिशक्ती धनदाई माता शिक्षण प्रसारक संस्थेच्या स्व. आण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, म्हसदी येथे ‘भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम’ यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) आणि ग्रंथालयशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. संजीव गिरासे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य तथा उपप्राचार्य प्रा. डॉ. शिवाजी पाटील, अधिसभा सदस्य डॉ. ऋषिकेश चित्तम, तसेच रासेयोचे धुळे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. हेमंतकुमार पाटील प्रमुख उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. हेमंतकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना “वाचाल तरच वाचाल” या उक्तीप्रमाणे वाचनाची सवय लावून व्यासंग वाढवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बाबासाहेब मोताळे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल प्रा. डॉ. विजय जाधव यांनी केले.

कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. बाबासाहेब मोताळे, प्रा. डॉ. विजय जाधव, डॉ. वनिता पवार, डॉ. हेमंत नांद्रे, डॉ. रमेश अहिरे, कार्यालय अधीक्षक अरुण पवार, बापू मोहिते आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि रासेयोचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com