-1.3 C
New York

Buy now

spot_img

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व शिष्यवृत्ती संदर्भात समाज कल्याण विभागाला सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीने निवेदन

नांदेड प्रतिनिधी :-

आज दि 19 जुन 2025 गुरुवार रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांना सम्यक विद्यार्थी आंदोलन नांदेड जिल्हा च्या वतीने निवेदन देण्यात साठी पदाधिकारी विद्यार्थी गेलो असता आयुक्त साहेब बाहेर होते त्यांच्या सोबत फोनवरुन बोलन करून सकारात्मक चर्चा केल्या नंतर स्वाधार सह शिष्यवृती आनी इतर मागण्याचे निवेदन राठोड मॅडम यांना देण्यात आले

प्रमुख मागण्या:-

1) डॉ. बाबसाहेब आंबेडकर स्वाधार योजना, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दोन टप्प्यात न देता शैक्षणिक वर्ष संपण्याच्या अगोदर एकाच टप्प्यात देण्यात यावी.

2) स्वाधार योजना 2024 – 25 या वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्रुटीची पुर्तता करण्यासाठी 15 जुलै 2025 रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी.

3) स्वाधार योजना 2023-24 या वर्षातील ज्या विद्यार्थीचें फॉर्म पेन्डींग किंवा त्रुटीत आहेत त्यांचे फॉर्म लवकरात लवकर चेक करून शिष्यवृत्ती वितरीत करण्यात यावी.

4) स्वाधार योजना 2023-24 या वर्षातील ज्या विद्यार्थ्यांचे दुसरा टप्पा प्रलंबित असेल तर त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करण्यात यावा.

5) स्वाधार विभागातील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना समजेल असे योग्य पद्धतीने प्रत्येक वेळेस त्रुटी न देता एकाच वेळेस त्रुटीची पुर्तता करण्यासाठी संधी देण्यात यावी.

6) भारत सरकार शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वर्षे संपूनही अद्यापही ज्या कॉलेजने शिष्यवृत्ती लवकर संपर्क साधून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा.

7) भारत सरकार शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपण्याच्या अगोदर दोन्हीही टप्पे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी.

वरिल विषयी निवेदन सादर करण्यात येते की, डॉ. बाबसाहेब आंबेडकर स्वाधार योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या वरील मागण्या लवकरात लवकर पुर्ण करण्यात याव्यात, अन्यथा लवकरच आपल्या कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ता कैलास वाघमारे, जिल्हाध्यक्ष भिमराव सुर्यवंशी, महासचिव नागेश दुधमल, रिपब्लिकन विद्यार्थी सेना जिल्हाध्य अंकुश सावते ,सम्यक जिल्हा सचिव संतोष थोरात, राहुल सोनकांबळे ता महासचिव प्रमोद पाटील,बळी ठोके ,प्रसेनजित गच्चे,अभय लोणे ,गंगाधर गच्चे सह विद्यार्थी पालक उपस्थित होते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com