जळगाव जा (दि. ३ जुलै २०२५) – मातंग समाज समन्वय समिती उत्तर विभाग जिल्हा बैठकीत डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व समाज मंदिर जळगाव जा येथील दुर्गा चौक येथे उभारण्याची जोरदार मागणी करण्यात आली. या बैठकीचे आयोजन जळगाव जा येथील विश्राम भवन येथे करण्यात आले होते.

या बैठकीस संजय बोदडे, संस्थापक अध्यक्ष, मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, तसेच जळगाव जा, संग्रामपूर, शेगाव भागातील व जिल्ह्यातील अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत बोलताना संजय बोदडे यांनी सांगितले की, पूर्वी दुर्गा चौक येथे समाज मंदिर अस्तित्वात होते. परंतु जळगाव जा शहर सौंदर्यीकरणाच्या नावाखाली शासनाने हे मंदिर पाडले. त्यावेळी त्यांनी एस.डी.ओ. कार्यालयासमोर समाजबांधवांसह उपोषण केले होते. त्या वेळी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आले होते की समाज मंदिर नव्याने बांधून दिले जाईल. मात्र आजपर्यंत हे आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही.
त्यामुळे आता त्याच जागेवर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व समाज मंदिर उभारावे, अशी ठाम मागणी बैठकीतून करण्यात आली.
या बैठकीत समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार व विविध समस्या यावर चर्चा करण्यात आली. यावेळी काही ठराव देखील संमत करण्यात आले.
या प्रसंगी प्रकाश प्रल्हाद बोदडे यांची मातंग समाज समन्वय समिती उत्तर विभाग जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा संस्थापक अध्यक्ष संजय बोदडे यांच्याहस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
बैठकीत विजय सोनोने, प्रकाश बोदडे, राजू तायडे व संजय बोदडे यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये –
गजानन जाधव, कैलाश सोनोने, उत्तमराव अहिर, एकनाथ चंदनशिव, प्रमेश्वर बोरसे, सुनील जाधव, विलास बोरले, श्याम वानखडे, राजू किसन तायडे, ज्ञानेश्वर सोनोने, संदीप चंदनशिव, रवी सोनोने, सचिन गोटूजी तायडे, अजाबराव तायडे, अनिल खंदारे, संजय नारायण बोदडे, गजानन भास्कर तायडे, पंकज खंदारे, धीरज अरुण खंदारे, रुपेश बोदडे, प्रल्हाद बोदडे, श्रीकृष्ण बोदडे, सागर सोनोने यांच्यासह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.
प्रकाश पर्व न्यूज आवाज वंचित बहुजनांचा
बाळापूर तालुका प्रतिनिधी :रामचंद्र नावकार



