-2.7 C
New York

Buy now

spot_img

“सोमनाथ सूर्यवंशी यांना मिळाला न्याय – बाळासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाला यश

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या खोट्या विधानावर कोर्टाचा दणका; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

बदलापूर प्रतिनिधी – विजय धों. गायकवाड

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर उभा राहिलेला लढा केवळ एका व्यक्तीसाठीचा नव्हता, तर तो न्यायव्यवस्थेवरचा विश्वास आणि संविधानिक मूल्यांचा विजय ठरला. अनेक राजकीय नेते सुरुवातीला या प्रकरणात आवाज उठवून मागे हटले, मात्र ॲड. बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांनी या कुटुंबाच्या पाठिशी ठाम उभं राहत शेवटपर्यंत संघर्ष केला.या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत “श्वसनाच्या त्रासामुळे मृत्यू झाला” अशी चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल केली होती. न्यायालयाने या प्रकरणात सत्यता तपासून अखेर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आता फडणवीस यांच्यावर देखील चुकीचं विधान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

बाळासाहेब आंबेडकर यांनी न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने दाखवलेला निर्धार आणि ‘मला फक्त न्याय पाहिजे’ हा त्यांचा आग्रह या लढ्याचे खरे प्रेरणास्थान ठरले.बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले की,”हा लढा एका व्यक्तीसाठी नाही तर संपूर्ण समाजाच्या न्यायासाठी आहे. आम्ही थांबणार नाही, जोपर्यंत अंतिम न्याय मिळत नाही.”

या प्रकरणाने संविधानिक मूल्यांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण अंगीकारून, बाळासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळवून देणारे महान कार्य सिद्ध केले आहे

जय भीम, जय संविधान!”मला फक्त न्याय पाहिजे!” – सोमनाथ यांच्या आईचा निर्धार”हा लढा न्यायासाठी आहे, आम्ही थांबणार नाही!” – बाळासाहेब आंबेडकर”आंदोलनांपेक्षा न्यायालयीन लढा महत्त्वाचा!”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com