-2.7 C
New York

Buy now

spot_img

भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिमच्या वतीने भोरगिरी बुद्धलेणी (खेड) येथे वर्षावास प्रवचन मालिका उद्धाटन कार्यक्रम आयोजन –

पुणे जिल्हा प्रतिनिधी – विशाल साहेबराव गायकवाड

प्रकाशपर्व न्यूज- आवाज वंचित बहुजनांचा

भोरगिरी, ता. खेड, पुणे — भारतीय बौद्ध महासभा दरवर्षी आषाढ पोर्णिमा ते अश्विन पोर्णिमा हा कालावधी मध्ये  तथागत भगवान बुद्धांच्या काळापासून वर्षावास चालू झाला आहे.जीव जंतू सजीव धोक्यात येवू नये आणि पावसामुळे भिक्खू संघ  यांना त्रास होऊ नये या उद्देशाने वर्षावासाची सुरुवात झाली .त्यासाठीच भारतीय बौद्ध महासभा पूर्ण भारतभर या तीन महिन्यामध्ये बौद्ध धम्मातील वेगवेगळ्या विषयावर प्रवचन मालिका राबवते.

दि बुद्धिष्ट  सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) शाखा पुणे जिल्हा पश्चिम यांच्या वतीने  वर्षावास प्रवचन मालीकेच उद्धाटन खेड तालुक्यातील भोरगिरी या निसर्गरम्य लेणीवर होणार आहे.तरी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पुणे पश्चिमचे अध्यक्ष आयु. प्रकाश ओव्हाळ यांनी पुणे बौद्ध बांधवांना बहुसंखेने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष आद.डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त कार्यक्रम लेणीवर करा या नुसार खेड तालुका अध्यक्ष आयू .श्रीकांत गायकवाड आणि तालुका कार्कारिणी यांनी भोरगिरी या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण: भोरगिरी बुद्ध लेणी, तालुका खेड (राजगुरुनगर)
दिनांक: गुरुवार, १० जुलै २०२५
वेळ: सकाळी १०.३० ते १.३०

कार्यक्रमाची रूपरेषा :

  • धम्म ध्वजारोहण –आद .पी .एस.ढोबळे लेफ्टनंट जनरल (SSD )
  • वंदना सुत्तपठन – पूज्य भन्ते अनिरुद्ध महाथेरो
  • उद्धाटन –आयु.सुभाष जौजाळे (रीपोटिंग ट्रस्टी चेअरमन)
  • कार्यक्रमाचे अध्यक्ष –आयु. प्रकाश ओव्हाळ (अध्यक्ष पुणे जिल्हा पश्चिम )
  • स्वागताध्यक्ष –आयु.श्रीकांत दादू गायकवाड (अध्यक्ष खेड तालुका)
  • सूत्र संचालन –आयु.रविकांत रणपिसे (सरचिटणीस पुणे जिल्हा पश्चिम )
  • आभार- दलितानंद थोरात (कोषाध्यक्ष पुणे जिल्हा पश्चिम )

कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य भारतीय बौद्ध महासभा खेड , पंचशील तरुण मित्र मंडळ, भोरगिरी यांचे लाभणार आहे .


Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com