5.3 C
New York

Buy now

spot_img

पैगंबर मुहम्मद यांच्या जयंती निमित्त श्रीरामपूरमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न

प्रकाशपर्वन्युज/अ.नगर/सुनिल वाघमारे

श्रीरामपूर (अहमदनगर): पैगंबर मुहम्मद यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्रीरामपूर शहरात दि. ५ सप्टेंबर रोजी एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘विद्रोही सांस्कृतिक चळवळ’, ‘जमिल काकर मेडिकल फाउंडेशन’, ‘बैतुशिफा मेडिकल फाउंडेशन’ आणि अहमदनगर येथील ‘साईसेवा ब्लड बँक’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

​या शिबिरात तीन महिलांसह एकूण ६३ जणांनी रक्तदान केले. यामध्ये हिंदू, मुस्लिम आणि सर्वच समाजातील नागरिकांचा सहभाग होता, ज्यामुळे सर्वधर्म समभावाचे उत्कृष्ट दर्शन घडले. ‘ज्याने एका जीवाचे रक्षण केले, त्याने समस्त मानवजातीचे रक्षण केले,’ या कुराणातील शिकवणीनुसार हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.​अशपाक शेख आणि मोहसीन बाऊन्सर यांच्यासारख्या अनेक रक्तदात्यांनी वर्षातून अनेक वेळा रक्तदान करण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्या या कृतीमुळे अनेक तरुणांना रक्तदान करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

.या वेळी श्रीरामपूरचे आमदार मा. हेमंत ओगले, माजी उपनगराक्ष मा. करण ससाणे, लोकनियुक्त नगरअध्यक्षा मा.अनुराधाताई आदिक, मा.लकीशेठ सेठी, साईबाबा संस्थानचे मा.सचिन गुजर, मा.सिद्धार्थ मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, विद्रोहीचे राज्य सचिव डॉ. जालिंदर घिगे, शंभूक वसतिगृहाचे अधीक्षक मा. अशोक दिवेसर, यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.या वेळी जावेद काकर, दिलीप नगारे, नाना पाटील, मुजफ्फर शेख, मुक्तार शहा, महेश साळवे, यांच्या हस्ते उपस्थितांना, प्रेषित मुहम्मद यांच्या जीवन चारित्रा वरील पुस्तकं भेट देवून सन्मान करण्यात आला. शहरातील सिख धर्मगुरु ग्यानी अलोक मस्कीन, व श्रीरामपूर शहर काझी, मौलाना अकबरअली सय्यद, उमर फारूक, मस्जिदचे हाफिज साहेब, शहर पोलीस स्टेशनचे पी.आय. मा.नितीन देशमुख, व त्यांचे सहकारी, कॉ. जीवन सुरुडे, मुदस्सर पटेल, वंचित बहुजन आघाडीचे सुनील वाघमारे, संतोष त्रिभुवन, ॲड. अमोल सोनवणे, तसेच राजेंद्र हिवाळे, रवी पंडित, साजिद शेख, ॲड. राजेश बोर्डे, अहमद जहागीरदार, याकूब कुरेशी, आरिफ बागवान, जोएब जमादार, रियाज पठाण, जाफर शाह, जाकीर शहा, इब्राहिमभाई, पोलीसमित्र मुस्ताक शेख, अकबर पठाण, यासिन सय्यद, लेबर ऑफिसर लतिफ पटेल, जमिलभाई काकर, शौकत शेख, सलीम जहागीरदार, तौफिक शेख, अहमद शहा, अमीन शहा, नूरभाई, फिरोज पोपटीया, तसेचअनेक राजकीय, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, इंजिनीअरिंग, वैद्यकिय, वकील, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मानवता फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम पठाणसर, व डॉ. सलीम शेख यांनी पुस्तकं भेट देउन सर्वांचे स्वागत केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com