
प्रकाशपर्व न्युज पोर्टल – धम्मपाल शिंदे पुणे व लातूर जिल्हा प्रतिनिधी
सासवड – उरुळीकांचन मार्गावरील बससेवा पुन्हा सुरु !सासवड-उरुळीकांचन ही पी.एम.पी.एम.एल. बस सेवा काही कारणास्तव बंद झाली होती. त्यामुळे विद्यार्थी तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत होते.

आज माझ्या हस्ते या बस सेवेचा शुभारंभ झाला असून सासवड – शिंदवणे घाट मार्गे – उरुळीकांचन असा या बस सेवेचा मार्ग असणार आहे.
या बससेवेमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुलभ होईल व नागरिकांच्या दैनंदिन कामकाजातही मोठी सोय होणार आहे या प्रसंगी सासवड, सिंगापूर, वाघापूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



