बुधवार, मे 27, 2026
Homeताज्या घडामोडीदिया धोंगडे अपहरण प्रकरण जलद तपास न झाल्यास वंचितचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे...

दिया धोंगडे अपहरण प्रकरण जलद तपास न झाल्यास वंचितचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांचा आंदोलनाचा इशारा

नाशिक | प्रतिनिधी
कु-हेगांव येथील 16 वर्षीय अल्पवयीन दिया योगेश धोंगडे हिचे 26 मार्च 2026 रोजी अपहरण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. याप्रकरणी वाडीव-हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असली तरी पोलिसांकडून तपासाला प्राधान्य दिले जात नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे व नगरसेवक अजय वाहने यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षकांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी अप्पर पोलीस उपअधीक्षक ग्रामीण मिरखेलकर यांनी स्पेशल गुप्तचर विभागामार्फत जलद तपास करण्याचे आश्वासन दिले.
चेतन गांगुर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “मराठा समाजातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणासारख्या गंभीर घटनेवर इतर राजकीय पक्ष शांत आहेत. जर पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.”
महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड यांनीही तपासात विलंब झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनीही तातडीने तपास करून मुलीचा शोध लावण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com