१९४७ साली इंग्रजांची सत्ता गेली आणि हा देश स्वतंत्र झाला. त्यानंतर २६ जानेवारी १९४९ ला देश प्रजासत्ताक झाला. प्रजेच राज्य घेऊन येणारा आपला पहिलाच देश… ह्या देशाची स्थिती त्यावेळी आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक अडचणींनी ग्रासलेली होती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व संविधान कमिटी ने मसुदा तयार करून देशाला घटना दिली. अश्याप्रकारे ही सगळी घटना मी एक नागरिक म्हणून वाचली, मला शाळेत शिकविली गेली. पण, मी आता जी स्थिती पाहते त्यावरून मला अनेक प्रश्न पडतात, इतरांसाठी नाही माझ्या स्वतः साठी मला प्रश्न पडतात… ” एक सामान्य नागरिक” म्हणून प्रश्न पडतात…
ते प्रश्न खालीलप्रमाणे:
१) मी स्वतंत्र आहे का…?
२) मानसिक दृष्ट्या कुठल्याही सामाजिक दबावाला बळी न पडता मी स्वतः चे निर्णय घेऊ शकते का?
३) पुढच्या काळात मुलांना चांगल्या प्रतीचे अन्न मिळेल का?
४) पुढच्या काळात मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळेल का?
५) मला माझ्या जातीच ओझ अजुन किती वर्ष पाळाव लागेल?
६) स्त्री समानता ह्या समाजामध्ये रुजत असताना त्यांना घाबरविण्याचे प्रकार संपतील का?
७) समाज म्हणून आपल द्येय काय आहे? ( कारण सामान्य माणसाला आवाज नसतो)
८) समाज म्हणून आपली दिशा काय आहे?
९) तरुणाईचे प्रश्न काय आहेत?
१०) digitalization मुळे येणाऱ्या पुढील अडचणींना तोंड द्यायला आपण समर्थ आहोत का?
११) industrilization च्या नावाखाली साद्या भोळ्या तरुणांची होणारी पिळवणूक ह्यावरती आपल लक्ष आहे का?
१२) सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो वरील सगळ्या प्रश्नाचा निष्कर्ष आहे, ” मी सुरक्षित आहे का?”




