-1.3 C
New York

Buy now

spot_img

गोलेगावचा भूमिपुत्र डॉ. सुनील स्वामी यांची यूपीएससी परीक्षेत यशस्वी घोडदौड – गावात भव्य सत्कार सोहळा

प्रतिनिधी: बालाजी सुनील गायकवाड, कंधार तालुका

गोलेगाव (ता. लोहा, जि. नांदेड) – गोलेगाव या छोट्याशा गावातून मोठं स्वप्न पाहून, जिद्दीने ते पूर्ण करणाऱ्या डॉक्टर सुनील रामलिंग स्वामी यांनी युपीएससी (UPSC) या देशातील सर्वोच्च नागरी सेवा परीक्षेत 336 वा क्रमांक पटकावला आहे. त्यांची निवड IAS अधिकारी म्हणून झाली असून, गावाचा आणि जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे.

डॉ. सुनील यांची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. शिक्षणासाठी त्यांनी आपल्या मावशीच्या घरी राहून जिल्हा परिषद शाळेत पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर संत गाडगेबाबा विद्यालय, लोहा येथे ज्युनिअर कॉलेज पूर्ण केले. पुढे बीएससी (अॅग्री) शिक्षण लातूर येथे पूर्ण करून, UPSC तयारीसाठी त्यांनी दिल्ली गाठले.

या अभिमानास्पद यशानंतर गोलेगाव ग्रामस्थांतर्फे सपत्निक भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. डॉ. सुनील यांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकासह मिरवणुकीने करण्यात आले. गोलेगावच्या आराध्य दैवत माता जनामाईचे दर्शन घेऊन स्वागत सोहळा जिल्हा परिषद शाळा, गोलेगाव येथे पार पडला.

या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये –

सौ. अर्चनाताई केंद्रे, सरपंच
केरबा भाऊ केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक
डॉ. गजानन भारती, ससून हॉस्पिटल, पुणे
सोपानराव केंद्रे, तंटामुक्ती अध्यक्ष
आनंद मामा गारोळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष
नामदेवराव व भगवानराव शेंडगे,
प्रा. रावसाहेब पाटील डांगे,
उत्तमराव केंद्रे, माधवराव केंद्रे, सहशिक्षक
दत्ता नाईकवाडे, बालाजी पांचाळ,
मुख्याध्यापक श्री. संतोष साखरे (रामाचा तांडा)
मुख्याध्यापक श्री. पोले सर (गोलेगाव)
केंद्रप्रमुख आचणे सर,
गटशिक्षणाधिकारी सौ. अंबलवाड मॅडम,

शिक्षण विस्तार अधिकारी शिंदे सर
… तसेच गावातील अनेक शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी, डॉ. सुनील स्वामी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत सांगितले की – “परिस्थिती कितीही कठीण असो, जिद्द, मेहनत आणि धैर्य असल्यास यश नक्कीच मिळते.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com