जनुना (ता. अंबड, जि. जालना) – दि :10 जुलै 2025 रोजी आषाढ पौर्णिमेपासून प्रारंभ होणाऱ्या वर्षावासाच्या पावन निमित्ताने महा प्रजापती गौतमी बुद्ध विहार, जनुना येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पवित्र धम्मग्रंथाच्या पठणास उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माता रमाई महिला मंडळ, जनुना यांच्या वतीने दीप प्रज्वलित करून करण्यात आली. यावेळी उपासिका बेबीबाई गवांदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच भारतीय संविधान व ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पवित्र ग्रंथांना आणि धम्मध्वजाला पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले.

ग्रंथ पठणाच्या प्रारंभ प्रसंगी शुद्धोधन दुर्योधन शेजव व गजानन भाऊ शेजव या धम्मवाचकांनी आषाढ पौर्णिमेचे व वर्षावासाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाला माता रमाई महिला मंडळ जनुना, गावच्या सरपंच आदरणीय अस्मिता ताई अमोल गवांदे, अमोल भाऊ गवांदे, राजू मामा खंडेराव, बोधाचार्य सागर भाऊ खंडेराव, माजी सर सागर भाऊ गवांदे, निरंजन शेजव,भारत शेजव , बाबुराव शेजव , शेषराव गवांदे, माजी सरपंच देवानंद भाऊ शेजव, विशाल शेजव, धम्मपाल शेजव, भारत भाऊ शेजव बाबुराव शेजव, धम्मपाल भाऊ धुरंदर, दिलीप शेजव, विशाल शेजव, हर्षल शेजव तसेच पंचशील बहुउद्देशीय क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य व महिला मंडळाच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पवित्र कार्यात माता रमाई महिला मंडळाचे विशेष सहकार्य लाभले असून, त्यांच्याच पुढाकाराने धम्मग्रंथाच्या पठणास प्रारंभ करण्यात आला आहे. गावातील सर्व लहान बालक व विद्यार्थ्यांना या कार्यासाठी मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या. हे पठण ग्रामस्थांच्या सहभागातून यशस्वी होणार असून, सर्वांसाठी हे अध्यात्मिक ऊर्जा देणारे ठरणार आहे.
प
