-1.3 C
New York

Buy now

spot_img

गल्हाटी नदीला आलेल्या पुरामुळे पिठोरी सिरसगाव गाव पाण्याखाली : जनजीवन विस्कळित, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

रामकिसन अवधूत -प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथे गल्हाटी नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. गावातील अनेक बौद्ध समाजाच्या घरात पाणी शिरून घरगुती साहित्य, धान्यसाठे वाहून गेले. एवढेच नाही तर गावातील बुद्ध विहारातही पाणी घुसले आहे.

शेतकरी वर्गावर पुराचा सर्वाधिक परिणाम झाला असून उस, सोयाबीन, कापूस, तूर आदी सर्व पिके पाण्याखाली गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

प्रशासनाकडून ग्राम महसूल अधिकारी व ग्रामसेवकांनी गावाची पाहणी केली असली तरी गावकऱ्यांनी तातडीची मदत मिळण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मा. किशोर भाऊ तुपे, सरपंच मा. कृष्णा आटोळे, उपसरपंच मा. पांडुरंग उढाण, ग्रामपंचायत सदस्य प्रेमानंद उढाण, आप्पासाहेब उढाण, लखन तुपे, भास्कर खरात, भागवत बापू उढाण तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष उमेश भाऊ पाष्टे यांनी एकमुखाने प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून “ओला दुष्काळ” जाहीर करण्याची व शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे.

ग्रामस्थांनी प्रशासनास त्वरित लक्ष घालून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

प्रतिनीधी -रामकिसन अवधुत

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com