-1.3 C
New York

Buy now

spot_img

“बीड रेल्वे स्थानकाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरु असलेले विशाल सोनवणे यांचे उपोषण संपले, संघर्ष मात्र कायम”

कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव

बीड : दि. 21/09/2025 रोजी आमचे भीमसैनिक विशाल सोनवणे यांनी बीड रेल्वे स्थानकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी दिनांक १६ सप्टेंबर २०२५ पासून बीड येथे रेल्वे स्थानकासमोर अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला अनेक सामाजिक कार्यकर्ते, भीमसैनिक तसेच स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत होता.

आज (२१ सप्टेंबर) त्यांनी आपले उपोषण सोडले. मात्र, ही लढाई अजून संपलेली नाही असे स्पष्ट करत सोनवणे यांनी सांगितले की, “बीड रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठीचा आमचा संघर्ष सुरूच राहील.

मागणी मान्य होईपर्यंत ही चळवळ अधिक जोमाने पुढे नेली जाईल.”या आंदोलनामुळे बीड जिल्ह्यातील भीमसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून येत्या काळात हा मुद्दा अधिक ठामपणे मांडला जाणार असल्याचेही समर्थकांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com