-1.3 C
New York

Buy now

spot_img

राष्ट्रवादीचे उपसरपंच व कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश

अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी : सुनिल वाघमारे

राहुरी, दि. २१ सप्टेंबर –
राहुरी तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत येथील राष्ट्रवादीचे विद्यमान उपसरपंच नितीनभाऊ कदम यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन युवा आघाडीत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

नितीनभाऊ कदम यांचा हा प्रवेश हा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतून प्रेरित होऊन आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा स्वीकार म्हणून झाला आहे. या प्रवेश सोहळ्यात मराठा आणि ओबीसी समाजातील अनेक बांधवांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला

या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नेते पिंटूनाना साळवे यांनी केले होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्ष बबलू पगारे, राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके, प्रसिद्धी प्रमुख विलास अहिरे, शिर्डी शहराध्यक्ष बाळाभाऊ गायकवाड, अक्षय बनसोडे, कमलभाई शेख, आकाश दिवे, राहुरी शहराध्यक्ष इमरानभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते सचिन साळवे, पत्रकार साळवेसाहेब, परदेशीसाहेब, भगिनी आयनोर पठाण आदींसह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन संतोष चोळके यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com