-1.3 C
New York

Buy now

spot_img

आदिमाया धनदाई देवीच्या जगाराला उद्यापासून सुरुवात

तालुका प्रतिनिधी विजय अहिरे

संपूर्ण परिसरातील श्रद्धाळू भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हसदी गावातील आदिमाया धनदाई देवीच्या जगाराला सोमवार दि. 22 सप्टेंबर 2025 पासून प्रारंभ होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात व धार्मिक ने साजरा होणार आहे.

धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा

पहाटेपासूनच अभिषेक, काकडा आरती, घटस्थापना, पूजा-अर्चा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवाच्या प्रत्येक दिवशी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, सकाळपासून रात्रीपर्यंत मंदिर परिसर भक्तीगीतांच्या गजराने आणि देवीच्या जयघोषांनी दुमदुमून जाणार आहे.

भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित

धनदाई देवीच्या दर्शनासाठी केवळ संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या बाहेरील राज्यांतूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. भाविकांच्या सोयीसाठी गावापासून ते मंदिरापर्यंत रस्त्यांची दुरुस्ती, प्रकाशयोजनेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच स्वच्छतेची काळजी घेण्यात आली आहे

मंडळाची जय्यत तयारी

धनदाई देवी तरुण ऐक्य मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. मंडळाच्या स्वयंसेवकांनी भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच दर्शन व्यवस्थेसाठी विशेष नियोजन केले आहे.

विजयादशमीचे विशेष आयोजन

विजयादशमीच्या दिवशी पहाटे साडेतीन वाजता अभिषेक पूजा, सामुदायिक काकडा आरती, विशेष पूजा व पाठ यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना हजारो भाविक उपस्थित राहतात.

मंडळाचे आवाहन

धनदाई देवी तरुण ऐक्य मंडळामार्फत सर्व श्रद्धाळू भक्तांना या धार्मिक सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, शिस्तबद्ध पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com