
हदगाव तालुका प्रतिनिधी उध्दव कवळे
हदगाव तालुक्यातील वायपण बु येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतिशय हाल होत आहेत.शाळेकडे जाणाऱ्या मेन रस्त्यावर पावसामुळे पाणीच, पाणी सातल्यांने विद्यार्थ्यांना जाण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पालक व गावातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

गावातील ग्रामपंचायतचे याकडे लक्ष नाही असे तेथील नागरिक आपली भावना व्यक्त करत आहेत. प्रकाश पर्व न्यूज च्या माध्यमातून नागरिकांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद यांनीच याकडे लक्ष द्यावे असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे



