0.4 C
New York

Buy now

spot_img

थार गावातील विजेचा प्रश्न सुटला; गावकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विजय भाऊ लहाने यांचे केले स्वागत

प्रकाशपर्व जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव

दिनांक : 01/10/2025 जालना जिल्ह्यातील थार गावामध्ये मागील दोन महिन्यांपासून वीज खंडित होती. या संदर्भात गावकऱ्यांनी अनेक वेळा स्थानिक आमदार व कार्यकर्त्यांना कळवूनही विजेचा प्रश्न सुटत नव्हता. अखेर ग्रामस्थांनी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ लहाने यांच्याकडे धाव घेतली.

विजय भाऊ लहाने यांनी तत्काळ पुढाकार घेतल्याने अवघ्या दोन तासांत विजेचा प्रश्न मार्गी लागला आणि थार गावात पुन्हा वीजपुरवठा सुरू झाला. या कामगिरीबद्दल गावकऱ्यांनी विजय भाऊ लहाने यांचे जोरदार स्वागत केले.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते व युवा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ लहाने, जिल्हा उपाध्यक्ष शेख लालाभाई,तालुका अध्यक्ष भानुदास साळवे, अरुण गायकवाड,नंदापूरचे सरपंच दत्तू कुरधाने, गौतम खरात, वंचितचे नेते अंकुश गाडेकर, बालू वाहेकर, विलास गाडेकर, परमेश्वर कानूले, जालिंदर गाडेकर तसेच गावातील सरपंच म्हलारी पठाडे, चोखाजी जाधव प्रदीप लहाने, कचरू मगरे, रघुनाथ पठाडे, नाना जाधव अक्षय गाडेकर, भरत खरात, सचिन खरात, लहानू गाडेकर, पुंजाराम खरात, सुधाकर वाहेकर, देवीचंद वाहेकर,मछिंद्र खरात व इतर गावकरी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ग्रामस्थांनी व्यक्त केले की, “वंचित बहुजन आघाडीने आमचा खरा प्रश्न सोडवला. त्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com