छत्रपती संभाजीनगर | दि. 23 फेब्रुवारी 2026
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजमाता जिजाऊ माँसाहेब, संत रोहिदास महाराज, त्यागमूर्ती माता रमाई, ज्ञानसूर्याची आई माता भिमाई, थोर संत सेवालाल महाराज, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगे बाबा यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वैचारिक व सामाजिक कार्याची पर्वणी छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
महाराष्ट्रातील सर्वप्रथम संयुक्त जयंती सोहळा स्नेहालय संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालभवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यंदा या कार्यक्रमाचे आठवे वर्ष होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन जे.जे. प्लस हॉस्पिटलचे सर्वेसर्वा, मार्गदर्शक व समाजसेवक डॉ. जीवनसिंह राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेच्या समन्वयक राणी निकाळजे व अश्विनी गवई तसेच सदस्य अभिमन्यू अंभोरे यांनी विशेष आमंत्रण दिले होते. कार्यक्रमाचे आयोजन अमोल होर्शिळ यांनी केले असून संयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालभवनच्या संपूर्ण टीमने केले.
याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेविका सौ. वैशाली कोरडे, समाजसेवक रामेश्वर कोरडे, मराठा क्रांती मोर्चाचे नेते सुनील कोटकर पाटील, प्रा. जयश्री शिर्के, समाजसेवक अमोल अंभोरे, स्वप्निल डिब्बे, विशाल खरात, आदित्य रगडे, गौरव जाटवे, सुमित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच विजय काळे यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून समाजप्रबोधनाचा संदेश दिला.




