19 C
New York

Buy now

spot_img

सावनेरमध्ये भीषण अपघातात युवकाचा मृत्यू

दुचाकीला मेटॅडोरची धडक महिला गंभीर जखमी

सावनेर पोलिस स्टेशन सावनेर हद्दीतील मधुमालती मंगल कार्यालयाजवळ भीषण अपघात घडला. भरधाव मेटॅडोर चालकाने मोटरसायकल चालकाला उडवले. झालेल्या भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाली आहे. देवानंद नारेकर मृत युवकाचे तर बेबीबाई पांडे या गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृतक देवानंद नारेकर रा. तेल कामठी हे आपल्या मोटारसायकल क्र. एमएच ४० जे ५६२१ ने उमरी येथून सावनेर दिशेने येत असताना समोरून भरधाव येत असलेल्या मेटॅडोर क्र. एमएच ३१ डब्लू ६६०७ने जोरदार धडक दिली. या अपघातात देवानंद

नारेकर यांचा जागीच मृत्यू झाला. मोटारसायकलवर मागे बसलेल्या बेबीबाई माणिकराव पांडे (७०, रा. सावंगी) या गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती आहे.

माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तत्काळ पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांना कळविले.

सावनेर पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. हितज्योती आधार फाउंडेशनच्या अॅम्ब्युलन्सद्वारे जखमींना व मृतदेहास सावनेर सरकारी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून देवानंद नारेकर यांना मृत घोषित केले. मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com